द्राक्ष बागांवर “डाऊनी” रोगाचा प्रादुर्भाव

बारामती : मागील महिनाभरापासून सातत्याने हवामानात होणारा बदल द्राक्षबागांच्या मुळावर झाला आहे. ढगाळ हवामान, धुके तर कधी कडक ऊन यामुळे द्राक्षबागा
रोगग्रस्त झाल्या आहेत. तसेच धुक्यामुळे द्राक्ष मनी तडा जात असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
ढगाळ वातारणात द्राक्षबागांवर ‘प्लझमोपॅरा व्हीटीकोला’ म्हणजेच ‘डाऊनी’ रोगाच्या बुरशीने द्राक्षबागा काळवंडू लागल्या आहेत. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागायतदारांना आता डाऊनी रोगाने जेरीस आणले आहे. द्राक्ष पिकाखाली बारामती तालुक्यात ३२५ हेक्टर तर इंदापूर तालुक्यात २ हजार २२० हेक्टर क्षेत्र आहे. या सर्वच क्षेत्रावर कमी-अधिक प्रमाणात डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.  या रोगाला केवडा, डाऊनी मिल्ड्यू असेही म्हणतात. डाऊनी रोगाची बुरशी ही जिवंत पेशीवर आपली उपजीविका करते. नवीन येणाऱ्या फुटी, ऊती हे रोगाला बळी पडतात. आपल्याकडील द्राक्ष बागायतदार उशीरा माल घेण्यासाठी एप्रिल छाटणी उशीरा करतात. त्यामुळे वेलीवर नवीन येणारी फूट पावसाळ्यात येते. त्यामुळे फुटी रोगाला जास्त बळी पडतात. आद्रतायुक्त हवामानात डाऊनी या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होतो. या रोगामुळे द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगाला दमट वातावरण अनकूल असते. डाऊनीची लागण द्राक्ष बागांमध्ये पाने, फुले व घडावर होत असते. त्यामुळे रोगग्रस्त भागावरील विषाणू मृत होतात व रोगग्रस्त भाग निकामी होतो. या रोगाला पोषक हवामान असल्यास रोगाचे नियंत्रण करणे अवघड होते. हा रोग द्राक्ष पिकात हमखास येणारा रोग आहे.

शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळले
डोर्लेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून डोर्लेवाडी व परिसरात बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. द्राक्ष बागा वाचविण्यासाठी  शेतकऱ्यांना हजारो रुपयांची औषधे खरेदी करावी लागत आहे. परिणामी उत्पादन खर्चात वाढ होऊ लागली आहे. डोर्लेवाडी परिसरात सुमारे १५० हेक्टर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. परिसरात वारंवार ढगाळ हवामान तयार होत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षाच्या उत्पादनावर बसणार कि काय असे वाटू लागले आहे.  या वर्षी ओल्या दुष्काळाचा फटका द्राक्षांना मोठ्या प्रमाणावर बसला. मागील महिन्यापूवीर्चा अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या नुकसानीतून द्राक्ष उत्पादक सावरत असतानाच वाचलेल्या बाग आता अवकाळीच्या संकटात सापडतात की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. सध्या आता सर्वत्रच ढगाळ वातावरण आहे. अनेक बागा ह्या फुलोरा व काढणीच्या आवस्थेत आहेत.परंतु या वातावरणामुळे दाक्षांचे मनी तडकू लागले आहे. तसेच घडामध्ये पाणीसाचून मणी खराब होत आहेत. द्राक्ष बागांवर मोठ्या प्रमाणावर डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. आठवड्यात आलेली थंडी ढगाळ वातावरण आशा बदलत्या वातावरनाचा फटका द्राक्ष बागांना बसत आहे. बदलत्या वातावरणामुळे द्राक्षणाचं नव्हेतर गहु, हरभरा,ज्वारी,मका, टोमॅटो, वांगी, पालेभाज्या यावरती होत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढहोत आहे.तयामुळे शेतकरी चांगलाच हतबल झालेला आहे.

बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्ष बागांना बसत असून अनेक बागांवर डाऊनी रोगाचा प्रदुर्भाऊ वाढला आहे.यामुळे द्राक्षावर औषधे,पावडर फवारणी अतिरिक्त बोजा शेतकर्यांवर पडत आहे.
– प्रवीण नवले
द्राक्ष उत्पादक,

पाऊस, वाढती थंडी व बदलते वातावरण या सगळ्याचा  फटका आता मोठ्या प्रमाणवर द्राक्ष बागांना बसणार आहे.परिणामी निर्यातक्षम द्राक्षांना मोठ्या प्रमाणात हानी पोचणार आहे.
– वैभव राऊत
द्राक्ष उत्पादक

बदलत्या हवामानामुळे द्राक्ष, पालेभाज, गहू आदी पिकांवर
डाऊनी,तांबेरा,करपा,यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ लगला असल्याने शेतकºयांनी आपल्या पिकांवर वेळेतच औषध फावरणी करणे गरजेचे आहे. तसेच
योग्य सल्ले घेऊन आपल्या पिकांना रोगराई पासून वाचवले पाहिजे.
बाजीराव कोळेकर
कृषी सहायक,

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा