मोठी जाहिरातबाजी करत मोदी यांचा वाढदिवस हजारो ड्रोनच्या साह्याने आकाशात लाईट शो करीत पुण्यात एसपी कॉलेजच्या मैदानावर करण्यात आला. त्यावर कोट्यावधी रुपये खर्च झाले. आता त्या एस पी कॉलेजच्या मैदानावर पडलेला कचरा आणि बॅनर पिशव्या आदी गोष्टी मात्र गेला आठवडाभर तिथेच पडून होत्या शेवटी आम आदमी पार्टी विद्यार्थी आघाडीचा अध्यक्ष अनिकेत शिंदे याने २७ सप्टेंबर रोजी पुणे महानगरपालिकेकडे तक्रार केली आणि त्यानंतर आज २९ रोजी महापालिकेच्या विभागाने हा कचरा साफ केला आहे.
यातला दुःखाचा भाग म्हणजे कोट्यावधीचा खर्च करणाऱ्या मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या टीमने सुद्धा हा कचरा साफ करण्याची जबाबदारी घेतली नाही तर कॉलेजने पण याकडे दुर्लक्ष केले आणि शेवटी महानगरपालिकेने आता हा कचरा उचलला आहे.
भाजपच्या तथाकथित शिस्तबद्ध कार्यकर्त्यांनी सुद्धा या कचऱ्याकडे दुर्लक्ष केले तर दुसरीकडे पुणे महापालिका सुद्धा स्वतःहून याची दखल घेत नाही ही खेदाची बाब आहे असे अनिकेत शिंदे याने याबाबत म्हटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी वैभव वाईकर











































_j---zTzHv.jpeg?updatedAt=1690873458545)
