नाशिकच्या नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला, मात्र श्रेय आमदार कांदे यांना की मंत्री भुजबळांना?

7

नांदगाव, नाशिक १० नोव्हेंबर २०२३ : राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंत्री उपसमितीची बैठक झाली. मात्र, चर्चा रंगली ती नांदगाव मतदारसंघाच्या दुष्काळाची. दुष्काळाच्या आढावा बैठकीत नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी दुष्काळ जाहीर व्हावा याकरिता पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करत निवेदन दिले.

त्याचवेळी बैठकीला माजी आमदार पंकज भुजबळ यांनीही हजेरी लावत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. या बैठकीला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील या सर्व मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी मंत्री भुजबळ हे ही आग्रही होते.

गेल्या काही दिवसांपासून नांदगाव तालुक्याला दुष्काळी जाहीर करावा, या मागणीसाठी सर्वच पक्षांनी आणि तालुक्यातील ग्रामस्थांनी आंदोलने निदर्शने केली. वेळोवेळी निवेदने हि देण्यात आली. तेंव्हा आता नांदगाव, न्यायडोंगरी आणि इतर भागातील मंडळांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु आता मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात या विषयावरून श्रेयवादाची लढाई सुरु झालीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा