केंद्र सरकारच्या औषध नियामक प्राधिकरणानं रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बॅचेस केल्या रद्द

5

मुंबई, २४ सप्टेंबर २०२० : रेमडेसिवीर औषध निर्मात्या कंपन्यांच्या काही बॅचेसमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने केंद्र सरकारच्या औषध नियामक प्राधिकरणानं रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बॅचेस रद्द केल्या आहेत. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तात्पुरता तुटवडा निर्माण झाला आहे. त्या कंपन्यांशी चर्चा झाली असून औषधाचा तात्पुरता तुटवडा दोन दिवसात सुरळीत करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि पुण्यातील सीरम् इन्स्टिट्यूटकडून विकसित करण्यात येत असलेल्या कोव्हिशिल्ड या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला कालपासून सुरुवात झाली. या देशव्यापी चाचण्यांमध्ये मुंबईतील महापालिकेच्या के.ई.एम रूग्णालय आणि नायर रूग्णालयांचा यात समावेश आहे.

ज्यांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, अशांना ही लस दिली जाणार आहे. के.ई.एम आणि नायर या दोन्ही रूग्णालयात दोनशे स्वयंसेवकांची या चाचणीसाठी निवड केली जाणार आहे. देशभरात दहा ते बारा केंद्रांमधून सोळाशे स्वयंसेवकांना कोव्हिशिल्ड लस दिली जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा