कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज पुरवणाऱ्या ड्रग्ज तस्कराला अटक

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२०: अभिनेता सुशांत च्या मृत्यूनंतर मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सीबीआयने तपास सुरू केला होता. मात्र, हा तपास नंतरुन बॉलीवूड ड्रग्स प्रकरणा पाशी येऊन थांबला. एनसीबीने याप्रकरणी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींवर कारवाई देखील केली. त्यातच काही दिवसांपूर्वी एनसीबीने कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरी छापा टाकला होता. त्यामध्ये तिच्या घरी ८६.५ ग्राम गांजा सापडला. भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली होती. आता एनसीबीने या दोघांना ड्रग्ज पुरवणाऱ्या ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेला ड्रग्ज व्यापारी हा अनेक बॉलिवूड अभिनेते आणि टीव्ही सिरीयल मधील कलाकारांना ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सुनील गवई असून तो भारतीला आणि हर्षला ड्रग्ज पुरवायचा. बुधवारी रात्री वांद्रे जंक्शन परिसरात कारवाई करून एक किलो २५० ग्राम गांजा जप्त केला होता. या प्रकरणी सुनील गवई याला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेला हा ड्रग्ज व्यापारी हा बॅगमध्ये ड्रग्ज ठेवायचा आणि दिवसभर अंधेरी, वर्सोवा, लोखंडवाला परिसरात फिरायचा. जशी जशी ड्रग्सची ऑर्डर येईल तसे तो त्या ठिकाणी जाऊन ड्रग्जची डिलिव्हरी द्यायचा. त्या ड्रग्सचे पैसे गुगल पे, फोन पे आदी पेमेंट ऑपशनद्वारे स्वीकारायचा. फूड डिलिव्हरी बॉय बनून तो पोलिसांना चकवत होता. मात्र, एनसीबीने धडक कारवाई करत आता त्याला ताब्यात घेतले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा