ड्रग्ज प्रकरणः साक्षीदार प्रभाकर सेल चा दावा – समीर वानखेडेंचाही खंडणीत सहभाग

मुंबई, ९ नोव्हेंबर २०२१ : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे दक्षता पथक मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल याची चौकशी करत आहे. या टीममध्ये ७ अधिकारी आहेत. डीडीजी एनसीबी ज्ञानेश्वर सिंह वांद्रे येथील सीआरपीएफ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले आहेत. दुपारी दोन वाजल्यापासून प्रभाकर सेल गेस्ट हाऊसमध्ये हजर आहे. तो आपल्या वकिलांसह येथे पोहोचला.

प्रभाकर सेलने एनसीबीच्या दक्षता पथकाला दिलेल्या जबानीत झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे खंडणी मागण्याच्या कटात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

प्रभाकर सेलचे वकील तुषार खंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनबीसी सध्या प्रभाकर सेल यांचे जबाब नोंदवत आहे. हे स्पष्टपणे षड्यंत्र असून पैसे उकळण्याचा खेळ करण्यात आला. यात समीर वानखेडे एकटा नाही. कदाचित एनसीबीचे आणखी लोक सामील असतील, असे त्यांनी सांगीतले.

तुषार खंदारे म्हणाले की, आता आम्हाला सांगण्यात येत आहे की एनसीबीच्या विशेष एसआयटी पथकाला प्रभाकर सेलचीही चौकशी करायची आहे. आम्ही त्यांना आधी नोटीस देण्यास सांगितले आहे. आम्ही सरकारला या प्रकरणी तातडीने एफआयआर नोंदवण्याचे आवाहन करतो.

मुंबई झोनचे एनसीबी संचालक समीर वानखेडे यांच्यावर साक्षीदार प्रभाकर सेल यांनी गंभीर आरोप केल्याने या प्रकरणातील सर्व समीकरणे बदलली होती. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या खळबळजनक आरोपानंतरच वानखेडे यांच्याविरोधात चौकशी सुरू झाली असून त्यांनी या प्रकरणातूनही माघार घेतली आहे.

 


न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा