नायजेरियन नागरिकाकडुन १० लाखांचे ड्रग्ज जप्त, नवी मुंबईतील कोपर खैरणे भागात पोलिसांची कारवाई

ठाणे, २६ ऑगस्ट २०२३ : महाराष्ट्रातील नवी मुंबई पोलिसांनी नायजेरियन नागरिकाला अटक केली असून त्याच्याकडून १० लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीला शुक्रवारी रात्री कोपर खैरणे येथून अटक करण्यात आली.

एक गुप्त माहितीवर कारवाई करून, नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने (ANC) कोपर खैरणे येथील एका पार्किंगच्या ठिकाणी सापळा रचला आणि रात्री ९ च्या सुमारास आरोपीला पकडले.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नानाचोर पॉल (३१) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १०० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. ते म्हणाले की, आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा