दुबईच्या त्रिविक्रम ढोल पथकाने पुण्यातील शिवसृष्टीत दिली छत्रपती शिवरायांना मानवंदना

63

पुणे, ३० मार्च २०२४ : आखाती देशातील पाहिले ढोल ताशा पथक म्हणून मान मिळवलेले त्रिविक्रम ढोल ताशा पथक यांचा महाराष्ट्र दौऱ्या मधील दुसऱ्या टप्प्यातील वादन पुण्यातील शिवसृष्टी येथे अत्यंत दिमाखात पार पडले. आदरणीय श्री बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या शिवसृष्टी, या आशियातील पहिल्या एकमेव ऐतिहासिक संकल्पा उद्यानात, त्रिविक्रम पथक दुबई ने छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. भारतातील नावाजलेली पथके बाहेर देशात जाऊन वादन सादर करण्याचे बरेच प्रसंग झाले, पण भारताबाहेरील आखाती देशातील मानाचे पहिले पथक असलेले त्रिविक्रम ढोल ताशा पथक यांनी पहिल्यांदाच भारतीय भूमीत येऊन केलेले वादन विशेष ठरते.

त्रिविक्रम ढोल ताशा पथकाचे संस्थापक अध्यक्ष श्री सागर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, त्रिविक्रम पथकाचा हा महाराष्ट्र दौरा, हा यूएई मधील तमाम मराठी जनांच्या राष्ट्रप्रेमाचे दर्शन भारतात येऊन घडवतो आहे. ह्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हे दाखविण्याचा प्रयत्न आहे की मराठी माणूस परदेशात राहून देखील आपली संस्कृती कशी जपू शकतो. महाराष्ट्र दौरा २०२५ याचेच उत्तम उदाहरण आहे आणि भविष्यातही आम्ही हे करत राहू अशी आम्ही तुम्हा सर्वांना खात्री देतो.

ह्या ऐतिहासिक वादन प्रसंगी त्रिविक्रम पथकाचे दुबईचे वादक व काही स्थानिक वादक उपस्तित होते. त्याचबरोबर शिवसृष्टीचे प्रशासक श्री अनिल पवार जी व जेष्ठ इतिहास अभ्यासक श्री शैलेश वरखडे जी ह्यांनी पथकाच्या हेतूची व कार्याची प्रशंसा केली व शुभेच्या दिल्या.

प्रतिनिधी : वैभव वाईकर