इंदापूर येथील दुधगंगा सहकारी दूध उत्पादक संघ सुरू: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर, दि. २० जून २०२०: इंदापूर तालुका दूध उत्पादनात अग्रेसर आहे. इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास सहा लाख लिटर दूध संकलित केले जाते. दुग्ध व्यवसाय आता दूध व्यवसाय राहिला नसून तो प्रमुख व्यवसाय बनला आहे. परंतु खाजगी दूध संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळेच इंदापूर येथील दुधगंगा दुध उत्पादक सहकारी संस्थेने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित अमुल या दूध संस्थेबरोबर करार केला असून ८ जून पासून याचे संकलन सुरू झाली असल्याची माहिती माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री तसेच दूधगंगा चे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील पत्रकार परिषदेत दिली.

इंदापूर तालुका दुग्ध व्यवसायात अग्रेसर आहे. यामध्ये दररोज पाच ते सहा लाख लिटर दुधाचे दरोज संकलन केले. यामधून शेतकऱ्यांना त्याप्रमाणात योग्य मोबदला मिळत नाही. याच धर्तीवर दुध गंगा दूध उत्पादक सहकारी संस्थेने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अमोल या संस्थेबरोबर करार केल्याने शेतकऱ्यांना दुधामध्ये प्रतिलिटर चार ते पाच रुपयांनी जास्त अधिकचा दर मिळत आहे.

सध्या दूधगंगा दूध संकलन करीत आहे यामध्ये शेतकऱ्यांना प्रामुख्याने पशुवैद्यकीय सेवा तसेच पशुखाद्य आणि इतर खाजगी दूध संस्थान पेक्षा अधिकचा दर मिळत आहे. दुध गंगा ने ११ मार्च २०२० ला अमोल या जागतिक दर्जाच्या संस्थेबरोबर पाच वर्षाचा करार केला आहे. इंदापूर तालुका कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

यामध्ये संस्थेकडे २५ बल्क कुलर आहेत त्यापैकी १४ ठिकाणी कुलर सुरू केले असून उर्वरित ठिकाणी देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. सध्या खासगी दूध संस्थांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे यामध्ये दुध गंगा च्या प्रामाणिक हेतू सामान्य दूध उत्पादक आला ज्यादा उत्पन्न मिळावे तसेच दररोज दोन वेळेस दूध संकलन सुरू राहणार असून दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रत्येक दहा दिवस आला त्याचा पगार मिळणार आहे.

सध्या कोरोणामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायाकडे प्रमुख व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे. यामध्ये संस्थेने दोन तज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टर नेमले असून दररोज तीन हजार लिटर दुधाचे संकलन सुरू केले आहे. तसेच सध्या या प्लांट ची एक लाख लिटर दूध हाताळण्याची क्षमता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यामार्फत अधिकचा दर तसेच कारभारामध्ये पारदर्शकता येणार आहे.

येणाऱ्या अडचणींवर संस्थेने मात करून शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा कसा होईल याकडे लक्ष दिले जाणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली यावेळी दूध गंगा चे चेअरमन मंगेश पाटील विलास वाघमोडे कार्यकारी संचालक एमडी कुलकर्णी आणि मान्यवर उपस्थित होते.
सोबत फोटो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा