नवी दिल्ली, ९ जानेवारी २०२३: उत्तर भारत कडाक्याच्या थंडीमुळं गारठलाय. देशाची राजधानी दिल्ली देखील हिवाळ्यातील तापमानाचा विक्रम मोडत आहे. हवामान खात्याचं म्हणणं आहे की, इंडो गंगेटिक मैदानी भागात हलके वारे आणि पृष्ठभागाजवळ जास्त आर्द्रता असल्यामुळं पुढील तीन दिवस धुकं खूप दाट असंल, याचा अर्थ दृश्यमानता शून्य मीटर असू शकते. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, उत्तर राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, त्रिपुरा, मध्य प्रदेशातही पुढील दोन ते तीन दिवस धुक्यानं कहर केलाय. त्यामुळं हवामान खात्यानं अनेक राज्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय.
रविवार हा दिल्लीतील हंगामातील सर्वात थंड दिवस होता. सफदरजंग येथे किमान तापमान १.९ अंश नोंदवण्यात आलं. गेल्या तीन दिवसांपासून राजधानीचं किमान तापमान हिल स्टेशनपेक्षा कमी नोंदवलं जातंय. म्हणजे हिल स्टेशन्सपेक्षा दिल्लीत जास्त हिवाळा जाणवत आहे. माहिती देताना हवामान तज्ज्ञ डॉ. आरके जेनामानी म्हणाले की, आम्ही पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि यूपीसाठी रेड अलर्ट तर राजस्थान आणि बिहारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. येथे खूप दाट धुकं असण्याची शक्यता आहे. १० जानेवारीपासून थंडीची लाट येणार नाही. त्यामुळं लोकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आम्ही वाट पाहत आहोत, कारण १० जानेवारीच्या रात्रीपासून नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स येणार आहे. त्यामुळं १० जानेवारीच्या रात्रीपासून दाट धुकं आणि थंडीची लाट ही सर्व परिस्थिती संपुष्टात येणार आहे.
धुक्यामुळं गाड्यांचा वेग मंदावलाय. उत्तर प्रदेश, बिहारमधून जाणाऱ्या राजधानी आणि दुरंतो एक्स्प्रेससह सर्व गाड्या तासनतास उशिरानं धावत आहेत. गाझियाबादमध्ये थंडीच्या लाटेमुळं इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ११ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवामान खात्याच्या मते, थंडीचा हा दुहेरी हल्ला ११ जानेवारीपर्यंत तुमच्या अडचणी वाढवणार आहे. १० आणि ११ जानेवारी रोजी काही शहरांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
पुढील ५ दिवस कडाक्याची थंडी
दिल्ली थंडीत गोठत असेल, तर उत्तर भारतातील इतर राज्यांचीही अशीच स्थिती आहे. यूपीपासून बिहारपर्यंत आणि मध्य प्रदेशापासून राजस्थानपर्यंत सर्वत्र थंडीनं जनजीवन ठप्प केलंय. जीवन व्यस्त झाले आहे. सर्व काही थांबलेले दिसते. हवामान खात्यानुसार, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान, पश्चिम आणि पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तीव्र थंडीची लाट पसरलीय. दिल्लीनंतर उत्तर प्रदेशात सर्वाधिक थंडी पडली आहे. जेथे बहुतांश शहरांचं तापमान २ ते ४ अंशांच्या दरम्यान आहे. कानपूरमध्ये पारा दोन अंशांनी घसरला. तर मिर्झापूरमध्येही पारा ४० अंशांवर राहिला. वाराणसीबद्दल बोलायचं झालं तर रविवारचं तापमान ३.८ अंश नोंदवले गेले. राजधानी लखनऊही गारठली आहे. तापमान चार अंश होते.
बिहारचीही तीच अवस्था आहे. येथे तिसऱ्यांदा शाळेच्या सुट्या वाढवाव्या लागल्या आहेत. आता १४ जानेवारीपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. पाटण्यात परिस्थिती वाईट आहे. सर्वत्र धुकं असून लोक थंडीपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. भागलपूरलाही धुक्याची चाहूल लागलीय. दिवसाही लोकांना वाहनांचे हेडलाईट चालू करावे लागत आहेत. ३२ किमी वेगानं बर्फाचे वारे वाहत आहेत. त्याचवेळी पंजाबमध्ये दाट धुकं आणि थंडीचा हल्ला झाला आहे. जालंधर आणि पठाणकोटमधील धुकं तीन दिवसांपासून विश्रांती घेत नाहीये. गाड्या उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. पंजाबमधील लुधियानामध्ये पारा ५.३ अंशांवर तर अमृतसरचा ६.६ अंशांवर नोंदवला गेला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे