गोल पोस्ट समाजकारण तक्रारीमुळे आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी गावाला भेट.

तक्रारीमुळे आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी गावाला भेट.

उस्मानाबाद, २६ जुलै २०२० : उस्मानाबाद तालुक्यातील लासोना ते नितळी पाटी रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे लासोना येथील अनेक शेतकऱ्यांनी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांना भेटून रस्त्याबाबत तक्रारी मांडल्या होत्या. नागरिकांच्या या तक्रारींना लक्षात घेऊन दिनांक २५ जुलै रोजी आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी लासोना या गावाला भेट देऊन या रस्त्याची पाहणी केली.

रस्ते, वीज, पाणी या मुलभूत सुविधा असून प्रत्येक नागरिकाला त्या मिळाल्या पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली.

सोबतच, सदर रस्त्यावर मुरूम टाकून दुरूस्ती करून घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना देखील त्यांनी सूचना दिल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या असणाऱ्या इतर समस्यांना देखील आपण लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

लासोना गावचे उपसरपंच श्री. संगमेश्वर स्वामी, श्री. निळकंठ पाटील, श्री. आबाजी यादव, श्री. जयराम पाटील, श्री. बालाजी कुंभार, श्री. ज्योतीराम कुंभार, श्री. बळी भोसले, आदी त्याप्रसंगी उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.

error: Content is protected !!
Exit mobile version