गोल पोस्ट महाराष्ट्र अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सरकारमधील सहभागामुळे, किरीट सोमय्या यांची गोची

अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सरकारमधील सहभागामुळे, किरीट सोमय्या यांची गोची

मुंबई, ४ जुलै २०२३ : राज्यातील वेगवेगळ्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांना आपला निशाणा बनवले होते. परंतु त्यांनी कधीच भाजपच्या कोणत्याच नेत्यावर तसे आरोप केले नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडीतील विरोधक सुद्धा किरीट सोमय्या यांना, फक्त विरोधी पक्षांनाच याबाबत टारगेट केले जात असल्याचा आरोप करत होते.

राज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर सोमय्या यांनी सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, खासदार प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादीच्या तर उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि शिंदे गटातील प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांच्याविरोधात मोर्चे बांधणी केली होती. मात्र शिंदे गट भाजपसोबत गेला आणि सोमय्या यांच्या यादितील सरनाईक, जाधव ही नावे बाजूला गेली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे वळवल्याचे अनेकांनी पाहिले आहे.

परंतु आता सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकणातील राष्ट्रवादीचे अनेक नेतेच आता भाजप पुरस्कृत सरकारमध्ये सहभागी झाल्याने सोमय्या यांची गोची झाली आहे. त्यामुळे हिसाब तो देनाही पडेगा हा डायलॉग आता ते कोणाला मारणार असा सवाल सामान्य जनता करताना दिसत आहे. याचमुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी चेहऱ्यांवर कोणतेही भाव न आणता, न बोलता जाणे पसंत केले आहे. त्यामुळे सोमय्या आता कोणाविरोधात आवाज उठविणार? असा प्रश्न केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version