कर्नाटकच्या नव्या पुलांमुळे शिरोळला महापुराचा जादा फटका बसणार ?

जयसिंगपूर, १० जून २०२३: आतापर्यंत आलेल्या महापुरांमुळे शिरोळ तालुक्याबरोबरच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातला कोट्यवधींचा फटका बसला असून, या भागातील शेतकरी आता हतबल झाला आहे. अशातच कर्नाटक सरकारकडून नव्याने सीमाभागात पुलांची निर्मिती केली जात आहे. या पुलांच्या भरावामुळे महापुराचा आणखी किती फटका बसणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संभाव्य महापुराचा विचार करून काय उपाययोजना केल्या पाहिजेत, यांचीही नोंद घेतलेली नाही.

कृष्णा नदीचे खोरे हे प्रचंड मोठे आहे. महाबळेश्वर येथे उगम पावणारी नदी आंध्र प्रदेशमधील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कृष्णा नदीच्या खोऱ्याचे क्षेत्रफळ २ लाख ५८ हजार ९४८ चौरस किलोमीटर असून, २८ हजार ७०० चौरस किलोमीटर महाराष्ट्रात, तर कर्नाटकातील क्षेत्रफळ १ लाख १३ हजार २७१ चौरस किलोमीटर तसेच आंध्र प्रदेशमध्ये २७ हजार २५२ चौरस किलोमीटर आहे.

कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणामुळे सातत्याने पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या महापुराला सामोरे जावे लागत आहे. असे असताना कर्नाटक सरकार सीमाभागात अनेक नव्या पुलांची निर्मिती करीत आहेत. याकडे मात्र राज्य सरकारने कोणत्याही प्रकारे लक्ष दिले नाही. यामुळे गेल्या वर्षभरापासून होत असलेल्या पुलांना शिरोळ तालुक्यातून मोठा विरोध होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने होत असलेल्या पुलांवर निर्बंध घालण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा