रस्त्याच्या वादातून शाळा बंद विद्यार्थ्यांचं नुकसान, पुण्याच्या सिंहगड सिटी स्कूल येथील प्रकार

पुणे, १२ ऑगस्ट २०२२: खाजगी जागा मालकाने रस्ता अडवल्याने शाळेला सुट्टी दिल्याची घटना पुणे येथील सिहगड सिटी स्कूल येथे उघडकीस आलीय. शाळेकडं जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने पत्रे व फलक लावून जागा मालकाने रास्ता बंद केल्यामुळं विध्यार्थी वाहतूक करणारी सर्व वाहने आतमध्ये अडकून पडली, त्यामुळं ही परिस्थिती ओढवल्याचं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलं. रस्ता बंद केल्याची माहिती महानगर पालिका प्रशासनाला देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणीक नुकसान होत असल्याचं शाळा प्रशासनानं म्हंटलंय. महापालिकेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नसल्याचं शाळेने सांगितलं.

जागामलकाच्या म्हणण्या प्रमाणं मागील १७ वर्षांपासून मैत्रीच्या नात्यानं आमच्याजागेतून हा रस्ता वापरण्यास दिला होता. त्याचप्रमाणं या जागेचा काहीही मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामुळं रस्ता बंद करण्यात आलाय. संस्थेने महापालिकेकडून मंजूर करून घेतलेल्या नकाशामध्ये कुठेही हा रस्ता दाखविलेला नाही. हा रस्ता आमच्या खाजगी मालकीचा आहे. शाळेचा या रस्त्याशी कोणताही संबंध नाही. त्यामुळं पालकांना व विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करू नये.

तर महानगर पालिकेच्या म्हणण्या प्रमाणं शाळेचं बांधकाम करताना संस्था चालकांनी चुकीचा रस्ता दाखवून महापालिकेची फसवणूक केलीय. त्यामुळं खाजगी जागेतून रास्ता द्यावा की नाही हा पूर्ण अधिकार जागामालकाचा आहे. तर शाळेने यावर आक्षेप नोंदवीला आहे. आम्ही चुकीच्या पद्धतीने बांधकाम केले तर महापालिकेने येवढे वर्ष कशा काय सुविधा पुरविल्या असा प्रश्न केला आहे. या सर्व वादामध्ये विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होतंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा