सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ‘सौरभ गांगुली’, जय शहा, पुढील तीन वर्षे करणार बीसीसीआयवर राज

10

पुणे, १५ सप्टेंबर २०२२ : बीसीसीआयच्या घटनेतील बदलाबाबत सुमारे तीन वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या अपीलवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.

न्यायालयाने बुधवारी निकाल देताना बीसीसीआयच्या घटनेतील दुरुस्तीलाही मान्यता दिली आहे. न्यायालयाने बीसीसीआयच्या याचिकेवर सुनावणी करताना कुलिंग ऑफ पिरियडशी संबंधित घटनेतील दुरुस्तीला मान्यता दिली आहे. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता सौरभ गांगुली पुढील तीन वर्षासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष राहू शकतात. याशिवाय जय शहा पुढील तीन वर्षासाठी बीसीसीआयचे सचिव राहतील.

सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी दिलेल्या मंजुरीमूळ भारतीय क्रिकेटमधल्या पदाधिकाऱ्यांना आता सलग बारा वर्षे प्रशासनात राहता येईल.

त्यामुळे आता सौरभ गांगुली आणि जय शहा हे आपल्या पदावर कायम राहणार आहेत. पण या निकाला मुळे अनेक भारतामधील अन्य क्रीडा संघटनावर देखील परिणाम होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

बीसीसीआयची काय होती मागणी ?

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांचा बोर्डाचा कार्यकाल पूर्ण होणार होता. याप्रकरणी बीसीसीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दोघांच्या कार्यकाळातील कुलिंग ऑफ कालावधी वाढवावा असे बोर्डाचे म्हणणे होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव