पोलिस नाईक संजय चौगुले यांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

सोलापूर, १२ सप्टेंबर २०२० : सोलापूर पुणे रस्त्यावरील सावळेश्वर टोल नाक्यावर कर्तव्य बजावत असताना हायवेवर गैस टँकर वेडावाकडा येत असल्याचे पाहून महामार्ग पोलिस केंद्र पाकणीचे पोलिस नाईक संजय चौगुले (बक्कल क्रमांक २२५) यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला.

परंतू गाडीचा ड्रायवर मूर्च्छित स्थितीत असल्याचे लक्षात येताच पो ना चौगुले यांनी मोठ्या शिताफीने चालत्या टँकरवर चढून ड्रायवर साईडचा दरवाजा उघडून ब्रेक मारून सदर टँकर थांबवला. त्यांच्या या धाडसी कार्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

टँकरचा ड्रायवर सीटवर पडलेला दिसल्यावर त्यांनी त्वरेने हालचाल केली व टँकरवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा