दुपारचं जेवण झाल्यावर डुलकी घ्यावी वाटते ना? नाही नाही… यात चूक काहीच नाहीय… परंतु जेव्हा आपण दुपारचं जेवण करतो त्या नंतर आपली कार्यक्षमता कमी होते, त्यामागे काय कारणं आहेत याचा विचार केला?
दुपारचे जेवण केल्यावर झोप येण्याचं कारण पचनतंत्राशी संबंधित आहे. जेवण केल्यानंतर जेव्हा आपल्या शरीरात पचनक्रिया सुरू होते तेव्हा पचन संस्थांना अन्न पचवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जेची गरज असते.
अन्न पचवण्यासाठी त्यांना अतिरिक्त एंजाइमचा स्राव करावा लागतो. ही गरज रक्तातून भागवली जाते. अशा स्थितीत रक्तप्रवाह पचनसंस्थांकडे अधिक वळवला जातो.
परिणामी यावेळी मेंदूला होणारा रक्तप्रवाह कमी होतो. मेंदूमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्याने मेंदू कमी क्रियाशील होतो. ज्यामुळे थकवा आणि आळस येतो. त्यामुळे झोपही येऊ लागते.