लॉकडाऊनच्या काळात राज्यात सायबर संदर्भात ४५५ गुन्हे दाखल

मुंबई, दि. ४ जून २०२०: २४ मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर कोविड -१९ विषयी अनेक अफवा काही समाज कंठकाकडून पसरवण्यात आल्या. त्याच बरोबर समाजात तेढ निर्माण होईल अश्या व्हिडिओ आणि मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्या. यावर सायबर क्राईम शाखेकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई नुसार राज्यात सायबर संदर्भात ४५५ गुन्हे दाखल झाले असून २३९ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४५५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याप्रकरणी पुढील प्रमाणे गुन्हे नोंदवले गेले आहेत.

• आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १८८ गुन्हे दाखल झाले आहेत,
• तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,
• टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व
• ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत,
• इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत.
• तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स,युट्युब) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २३९ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यात करण्यात यश आले आहे.

ॲप डाऊनलोड करताना काळजी घ्यावी

सध्या इंटरनेटवर छोटे व्हीडिओज बनविण्यासाठी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत त्यात प्रामुख्याने टीकटॉकचा वापर केला जातो. पण टीकटॉक हे चायनानिर्मित ॲप असल्यामुळे ‘मित्रो’ नावाच्या दुसऱ्या एका ॲपला लोक पसंती देत आहेत. सध्या लॉकडाऊनच्या काळात, बहुतांश नागरिक घरीच असल्याने, करमणुकीसाठी हे ॲप डाउनलोड करून त्यावर विडिओ बनवून ते सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहेत. मित्रो हे ॲप भारतीय आहे की नाही याविषयी देखील शंका व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार या ॲप् चा प्रोग्राम सोर्स पाकिस्तान मधून खरेदी करण्यात आला आहे. ॲप इंस्टॉल करताच तुमच्या फोनमधील विविध एक्सेस मागते ज्यामुळे तुमच्या फोनमधील महत्वपूर्ण माहिती हॅकर चोरू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा