गोल पोस्ट महाराष्ट्र शरीर संबंधावेळी कुछ तो नया ट्राय करण्याच्या नादात तरूणाला बसला गळफास….

शरीर संबंधावेळी कुछ तो नया ट्राय करण्याच्या नादात तरूणाला बसला गळफास….

नागपूर, ९ जानेवारी २०२१: आजच्या पिढीतील तरूण काय करतील याचा काही नेम नाही. पण, त्यांचे विचित्र वागणे हे त्यांच्याच जिवावर एक दिवस बेतेल हे कळतच नाही. काळ जरी बदलत असला तरी लैंगिक विषयावर आजच्या तरूणाईला योग्य ते मार्गदर्शन नाही. ज्याचा परिणाम वाईट घटतो. अशीच एक घटना नागपूर मध्ये घडली आहे. मोबाईल मध्ये पॉर्न बघून सेक्स करत असताना एका तरुणाला गळफास बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

ही धक्कादायक घटना नागपूर जिल्हातील खापरखेडा परिसरात महाराजा लाॅजमधे घडली. मृत तरूणाचे वय २७ वर्ष असून तो इंजिनियर आहे. तर तरुणीचे वय २२ सांगितले जात आहे. मृत तरुण सध्या बेरोजगार असल्याची माहिती ही समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार २२ वर्षीय तरूणी आणि तरूण गेल्या अनेक वर्षापासून प्रेमसंबधात होते. जवळपास पाच वर्षेपासून त्यांचे प्रेम होते. दोघांनी बाहेर एकांतात फिरायला जाण्याचा बेत आखला आणि ते दोघे खापरखेडा परिसरात महाराजा लाॅजमधे गेले.

दोघे महाराजा लाॅजमधे गेले आणि तिथे त्यांनी एक रूम बुक केली. त्या नंतर त्यांच्या दोघांमधे शरीरसंबंध झाले व या वेळी मोबाईल मधील व्हिडिओ बघून काहीतरी नवीन करण्याचा प्रस्ताव तरूणाने तरूणीला दिला आणि त्या साठी तरूणीनेही होकारार्थी मान डोलावली. व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तरुणीने तरुणाला खुर्चीवर बसवून त्याच्या हाताला व पायाला दोरी बांधली. तसेच ही दोरी त्याच्या गळ्याभोवती देखील बांधली.

शरीर संबंध पूर्ण झाल्यावर तरुणी बाथरूम मध्ये गेली. या दरम्यान तरुण खुर्चीवरुन खाली पडला मात्र त्याच्या गळ्याभोवती असलेला दोरा वळला गेला आणि यातच त्याला फास लागून त्याचा मृत्यू झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version