मुंबई, ६ ऑक्टोबर, २०२२ : कधीही न घडणाऱ्या कृतीची इतिहासात नोंद होणारी घटना या घडली. या दसरा मेळाव्याला एक नाही तर दोन दसरा मेळावे झाले. ते सुद्धा शिवसेनेचे. एकाच पक्षाचे दोन मेळावे, जरा अजबच गोष्ट आहे. हो, हे ऐकायला जरी अजब वाटले तरी पण हेच वास्तव आहे. एक मेळावा होता शिवसेनाप्रमुख उद् ठाकरेंचा आणि दुसरा होता शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदेचा… दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे पण आणि नाही पण…
आता सुरुवात करुयात उद्धव ठाकरे यांच्या सभेपासून… सभा सुरुवातीपासूनच वादात होती. दसरा मेळावा शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्कवर होणार की नाही? यापासूनच या मेळाव्याला गालबोट लागले. तेव्हापासूनच या मेळाव्याला एक प्रकारचा मोडता आला होता. पण अखेरीस न्यायालयाने परंपरेच्या नावाखाली शिवसेनेला अर्थात उद्धव ठाकरेंना परवानगी दिली. त्यांनी ती लढाई जिंकली. पण सभेच्या वेळी शिवतीर्थावर खूप गर्दी दिसली नाही. त्यावरुन उद्धव ठाकरे यांचा प्रभाव कमी होतो आहे का? असा प्रश्न मनात निर्माण होतो. त्याचबरोबर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरे सांभाळू शकत नाही काय़? अशी शंका मनात आल्याशिवाय रहात नाही. भाषणातले मुद्दे हे मागच्या अनेक सभेत मांडलेले असल्यामुळे भाषणात नाविन्य नव्हते. त्याच त्याच मुद्द्यामुळे जनता उत्सुक नसल्याचं प्रामुख्याने दिसून आलं. गद्दार, खोके, पक्षप्रमुख पदाची हाव असे आरोप अनेक उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केले. माध्यमांचा फटका उद्धव ठाकरे यांना बसला. गेले दोन दिवस माध्यमे शिवतीर्थावर आदित्य ठाकरे यांची तोफ कडाडणार असे म्हणत असताना मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु झाले. त्यामुळे माध्यमांवरचा आदित्य ठाकरेंचा प्रभाव कमी पडला असा लोकांमध्ये समज झाल्याच्या चर्चा सुरु आहेत.
आता वळूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेकडे… विराट गर्दी हा प्लस पॉईंट यावेळी शिंदे गटाला पहायला मिळाला. त्यातही माध्यमांचा प्लस पॉईंट शिंदे गटाला मिळाला. त्यात एकनाथ शिंदे यांचे भाषण उशीरा झाल्याने त्यांना उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे खोडून काढता आले.
या सभेत त्यांनी मनातली खदखद बोलून दाखवली. त्यात राष्ट्रवादीवर त्यांनी निशाणा साधला. तर उद्धव ठाकरे कसे आमच्या बाजूने उभे राहिले नाहीत, हे दाखवून दिले. आम्ही किती सहन केले आणि आम्हाला कसे डावलले गेले हे त्यांनी सभेतून जनतेला सांगितले. पण याच सभेतून अनेक लोक नंतर निघून जाताना दिसली, हे चित्र देखील विसरता येणार नाही.
त्यामुळे आता दोन्ही नव्हे एकाच पक्षाने विचार करण्याची गरज भासू लागली आहे… असे म्हंटल्यास हरकत नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस