दसरा मेळावा – उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे टीकास्त्र

मुंबई, ५ ॲाक्टोबर , २०२२: अथांग जनसागरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला संबोधित केले. मी तुमच्यातला एक आहे. तुम्ही न्यायालयात जाऊन मैदान जिंकल, पण हे प्रेम कुठून आणणार?
या वेळी त्यांनी सांगितलं की बाळासाहेब रिमोट कंट्रोल ने देश चालवायचे, पण तुम्ही राष्ट्रवादीच्या हातात रिमोट कंट्रोल दिला. बाळासाहेबांच्या विचारांना मविआने मूठ माती दिली, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आम्ही जे केलं ते राज्याच्या हितासाठी, जे केलं ते सत्यासाठी आणि सत्वासाठी, सत्तेसाठी नाही.
वारसा हा जपण्यासाठी असतो. आम्ही वारसा जपला विचारांचा, हे सत्य आहे. आम्हाला गद्दार आणि खोके एवढच ऐकवलं. जेव्हा तुम्ही मविआशी युती केली , तेव्हाच तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली. आम्ही केला तो गदर म्हणजे क्रांतीच. हे जनतेने ओळखले म्हणून आज जनता आमच्याबरोबर आहे.

उद्धव ठाकरे तुम्ही गद्दारी केली, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. २५ वर्षे सडलो, हे तुम्ही कसं सांगू शकता.
आम्ही नाही तुम्ही गद्गार आहात. म्हणून आता बाळासाहेबांच्या शिलेदारांबरोबर जनता आहे. तुम्ही आमचा किती अंत पाहणार आहात. तुम्ही वैचारिक व्यभिचार केला.

शिवसैनिक सांगत होते, की मविआ खड्ड्यात घालणारी आहे. हे सांगूनही आम्ही गप्प होतो. कारण तुम्ही बाळासाहेबांचा अंश आहे. तेव्हा त्यांनी आमचं ऐकलं नाही. असे अनेक आरोप उद्घव ठाकरेंवर केले.

राजकारणातली समीकरणे मुख्यमंत्र्यांनी उलगडून दाखवली.
का तुम्हाला सोडलं ? याचा विचार करा, आत्मपरीक्षण करा, असा सल्ला देखील दिला. आम्ही केला तो उठाव होता. हा निर्णय आम्ही आनंदाने घेतला नाही. विचारांची कास कोणी सोडली? हे सांगा.
भारतात राहून पाकिस्तान जिंदाबाद वरुन बोलणाऱ्याला ठेचून काढले जाईल. पीएफआयला बंद केलं. केंद्र सरकारने यावर कारवाई केली. यावर तुम्ही का बोलला नाही? काँग्रेस बोलेल म्हणून तुम्ही काही बोलला नाही.

काही लोकांना आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केली. ही मुर्खपणाची मागणी कोणी केली? हे सांगण्याची गरज नाही. बाळासाहेब आणि शरद पवार यांची मैत्री होती. पण बाळासाहेब यांनी कधीही राजकारणात मैत्री आणली नाही. ज्यांना बाळासाहेबांनी लांब ठेवलं तर त्यांना तुम्ही जवळ केलं आणि आमची फरफट केली, असं त्यांनी सांगितले .

हे नेते कष्टातून आले. तिथून शिवसेना उभी राहिली. ती तुमची प्रायव्हेट कंपनी नाही, असं त्यांनी खडसावून सांगितलं. अरे आता तरी सावधान व्हा.असे त्यांनी निक्षून सांगितलं. या राज्याच्या विकासांचे कंत्राट मी घेतले आहे. मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. मी विकासांचे शिवधनुष्य उचलले आहे. राज्याला सुजलाम आणि सुफलांम करण्याचे मी कंत्राट घेतले असल्याचं त्यांनी सांगितलं . तुम्ही तुमची काळजी करा. सरकारची नको. असा खोचक टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
कोरानाकाळात मी सगळीकडे फिरलो. बाळासाहेब कायम आमच्या पाठीशी उभे राहिले. तुम्ही कोणाच्यातरी पाठिशी उभे राहिलात का ?

तुम्ही मला मोदी आणि शहांचे हस्तक म्हणतात. तर दहशतवाद्यांचे हस्तक होण्यापेक्षा हे हस्तक होणं मला अभिमानास्पद वाटतं. असं त्यांनी सांगितलं. कार्यांचे उल्लेख केले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातून केलेले मुद्दे त्यांनी खोडून काढले.
आम्ही कधी खोटे धंदे केले नाही.
तुमची लायकी तुम्हीच काढली.
तुम्ही माझ्यावर अनेक आरोप केले. पण तुम्ही टीका करताना विचार करा. आता संधी मिळाली तर विकास कामे करा. गणपती नवरात्रीप्रमाणे दिवाळी मोठी केली.

मला कधीच प्रमुख पदाचा मोह नव्हता, असे सांगताना त्यांनी उद्घव ठाकरे यांना प्रतिउत्तर दिले. विकासकामांचा आढावा घेतला.
असे अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. त्यामुळे हा मेळावा एकनाथ शिंदेनी प्रतिउत्तर देत गाजवला. हे खरं.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा