तांत्रिक अडचणी आणि अतिवृष्टीमुळे पिकांची नोंदणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरीप हंगाम २०२५-२६ च्या ‘ई-पीक पाहणी’ नोंदणीची अंतिम मुदत आता ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १४ सप्टेंबर होती.
‘डीसीएस ई-पीक पाहणी’ (व्हर्जन ४.०.०) या ॲपवर सर्व्हर डाऊन होण्याच्या तक्रारी येत असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करताना अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तहसीलदार जीवन बनसोडे यांनी सर्व शेतकऱ्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन वेळेत नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नोंदी पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे












































