दिल्ली एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी २०२३ :दिल्ली एनसीआरमध्ये बुधवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.८ रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपाचे धक्के पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्येही जाणवले.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा भूकंप झाला. नेपाळमधील जुमला येथून 69 किमी अंतरावर भुकंपाचे केंद्र होते. मात्र, दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के सौम्य जणवले. सुदैवाने यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

  • पिथौरागढमध्येही भूकंप

दरम्यान, उत्तराखंडच्या पिथौरागढमध्येही बुधवारी दुपारी दीड वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता ४.४ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १० किमी अंतरावर तर पिथौरागढपासून १४३ किमी अंतरावर होता. त्या घटनेतही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा