मणिपूरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!

37

मणिपूर, ४ फेब्रुवारी २०२३ :मणिपूरमधील उखरुलमध्ये आज म्हणजेच शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केल एवढी होती.

मिळालेल्या माहितीनुसार ,सकाळी ६ वाजून १४ मिनिटांनी हा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर आत होता. या भूकंपामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.

यापूर्वी शुक्रवारी रात्री उत्तर प्रदेशातील शिमलामध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल एवढी होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा