उत्तराखंडमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के !

पिथौरागढ, २२ जानेवारी २०२३ :उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी सकाळी ८ वाजून ५८ मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टल स्केल एवढी होती.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील पिथौरागढपासून २३ किमी दूर भूकंपाचे झटके जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १० किलोमीटर खाली होते. या भूकंपामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.

दरम्यान, यापूर्वी डिसेंबर महिन्यात उत्तराखंडमधील उत्तरकाशी आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टल स्केल एवढी होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा