हिंगोली, ३१ जानेवारी २०२१: महाराष्ट्रातील हिंगोली मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार रिक्टर स्केलवर भूकंपाचे मापन ३.२ होते. भूकंपातून कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. रात्री १२.४१ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.
यापूर्वी मंगळवारी पुणे जिल्ह्यात २.६ तीव्रतेचा भूकंप झाला. सायंकाळी ७.२८ वाजता आलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू पुण्यापासून २१ किमी दक्षिणपूर्व, पुरंदर तालुक्यात १२ किमीच्या अंतरावर होता.
दुसरीकडं २८ जानेवारीला दिल्ली मध्ये सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिक्टर स्केलवर २.८ मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्रबिंदू पश्चिम दिल्लीत १५ कि.मी. खोलीवर होते.
यापूर्वी १३ जानेवारी रोजी नोएडामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. १३ जानेवारीला झालेल्या भूकंपाची तीव्रता २.९ मोजली गेली. २५ डिसेंबर रोजी दिल्ली आणि एनसीआरच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे