तुर्की मध्ये भूकंप तर ग्रीस मध्ये त्सुनामीचा कहर

3

तुर्की, ३१ ऑक्टोबर २०२०: शुक्रवारी तुर्की आणि ग्रीसच्या सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवरील तीव्रता ७.० मोजली गेली. भूकंपानंतर त्सुनामीने ग्रीसमध्ये दार ठोठावले आहे. भूकंपामुळे तुर्कीमध्ये मोठी नासधूस झाली आहे. इजमिरमध्ये अनेक ठिकाणी इमारती पडल्या आहेत.

तुर्कीमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७०९ हून अधिक लोक जखमी आहेत. तुर्कीचे आरोग्यमंत्री फहार्टिन कोका म्हणाले की, दुर्दैवाने या भूकंपात आमच्या १७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तुर्की किनारपट्टीवरील शहर इजमिरमध्ये इमारती कोसळल्या आहेत. तुर्की माध्यमांच्या माहितीनुसार इजमिरचे राज्यपाल म्हणाले की ७० लोकांना वाचवण्यात यश आेलं आहे.

तुर्कीचे गृहराज्यमंत्री सुलेमान सोयलू यांनी ट्विटरवर सांगितले की, आतापर्यंत आम्हाला सहा पाडलेल्या इमारतींविषयी माहिती मिळाली आहे. ते म्हणाले की भूकंपामुळे बोर्नोव्हा आणि बेराकलीतील इमारतींचे नुकसान झाले. ते म्हणाले की, अनेक पथके मदत व बचाव कार्यासाठी वेगवेगळ्या शहरात कार्यरत आहेत.

तुर्कीचे पत्रकार मोहसीन मुघल म्हणाले की, आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. ७०९ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. २० इमारती पडल्या आहेत. मदत व बचाव कार्य प्रगतीपथावर आहे. ते म्हणाले की, पावसामुळे मदत आणि बचावकार्य रखडले आहे. इमारती कोसळल्या आहे तेथून आतापर्यंत ७० लोकांची सुटका करण्यात आली आहे.

त्याच वेळी ग्रीक माध्यमांच्या म्हणण्यानुसार भूकंपामुळे सामोसच्या पूर्व ईजियन समुद्र बेटावरही त्सुनामी आली. इमारतींचे नुकसान झाले आहे. अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, भूकंपाचे केंद्रस्थानी ग्रीसच्या नॉन-कारलोवासियन शहराच्या ईशान्येस १४ किलोमीटर अंतरावर होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा