पृथ्वीच्या वातावरणाचा चंद्रावर होतोय परिणाम: जितेंद्र सिंग

नवी दिल्ली, ७ सप्टेंबर २०२०: डॉ जितेंद्र सिंग, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ईशान्य प्रांत विकास; राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय; कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन; अणु ऊर्जा आणि अंतराळ यांनी आज माहिती दिली की, इस्रोच्या पहिल्या चंद्र मोहिमेने पाठवलेल्या छायाचित्रातून दिसते की, चंद्राला ध्रुवांवर गंज चढल्यासारखा दिसत आहे. या शोधाचा संकेत असा आहे की, जरी चंद्राच्या पृष्ठभागावर लोह-समृद्ध खडक आहेत, मात्र गंज चढण्यासाठी लागणारे दोन घटक पाणी आणि ऑक्सीजन चंद्रावर आहे की नाही, याची माहिती नाही.

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा) च्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, पृथ्वीच्या स्वतःच्या वातावरणामुळे याला मदत होत आहे, म्हणजेच पृथ्वीचे वातावरण चंद्राचेही संरक्षण करत आहे. अशाप्रकारे, चांद्रयान-१ ने पाठविलेली माहिती दर्शवते की, चंद्राचे ध्रुव पाण्याचे गृह आहेत, हेच शास्त्रज्ञ उलगडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

डॉ जितेंद्रसिंग म्हणाले, चांद्रयान-३ संबंधी सांगायचे झाले तर, २०२१ च्या आरंभी याचे प्रक्षेपण केले जाऊ शकते. चांद्रयान-३ हे चांद्रयान-२ ची पुनरावृत्ती असेल आणि यात लँडर आणि रोव्हर हे चांद्रयान-२ प्रमाणेच असेल फक्त ऑर्बिटर असणार नाही.

दरम्यान, भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम, मिशन गगनयानची तयारी सुरु आहे, असे डॉ जितेंद्रसिंग यांनी सांगितले. यासंबंधीचे प्रशिक्षण आणि इतर प्रक्रिया सुरु आहे.

कोविड संक्रमणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गगनयान मोहिमेच्या योजनेत काही अडथळे निर्माण झाले, पण २०२२ च्या वेळापत्रकानूसार मोहीम आरंभ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा