“मनोसोक्त पिझ्झा खा आणि मृत्युनंतर पैसे द्या”

न्युझीलंड, ३० मे २०२३ : पिझ्झा म्हणजे फक्त अन्न नाही; तर काहींसाठी ही एक भावना आहे, जीवनाचा आनंद आहे. तुम्ही आत्ता पिझ्झा ऑर्डर करून नंतर पैसे देऊ शकत असाल तर ? आश्चर्य वाटले ना ? पण न्यूझीलंडमधील पिझ्झा रेस्टॉरंट एक पाऊल पुढे गेले आहे आणि त्यांनी नविन योजना सुरु केली आहे: आता पिझ्झा खरेदी करा आणि मृत्युनंतर पैसे द्या.

न्यूझीलंडच्या ‘हेल्स पिझ्झा’ ने आपल्या ग्राहकांसाठी एक अनोखी पेमेंट पद्धत जाहीर केली आहे. “आता खरेदी करा, नंतर पैसे द्या” ही संकल्पना घरोघरी पिझ्झा डिलिव्हरी ऑफर करते, परंतु एक ट्विस्टसह. रेस्टॉरंटच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ही “आफ्टरलाइफ पे” पॉलिसी फक्त ‘६६६’ ग्राहकांसाठी उपलब्ध असेल, ज्यांना त्यांचा मृत्यू होईपर्यंत पेमेंट पुढे ढकलण्यासाठी त्यांच्या इच्छेनुसार कायदेशीररित्या लागू करण्यात आलेल्या करारावर स्वाक्षरी करावी लागेल. ग्राहकांना सुरुवातीला ही योजना असामान्य वाटल्याने, पिझ्झा चेनने त्यांना आश्वासन दिल की या योजनेत कोणतेही छुपे दंड किंवा फसवणूक नाही.

तुम्ही मोफत पिझ्झा कसा घेऊ शकता ?
मोफत पिझ्झा मिळवू इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांनी पिझ्झा चेनच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. निवडले गेल्यास, कंपनी त्या ग्राहकांसोबात एक करार करेल आणि त्यांच्या मृत्यूपत्रात याबद्दल लिहीले जाईल. नंतर स्वाक्षरी करण्यासाठी त्या ग्राहकांना सांगण्यात येईल. हा करार कायदेशीररित्या लागू करण्यायोग्य असल्याने यात कोणतेही व्याज किंवा अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

ग्राहकांनी ही योजना केवळ मोफत पिझ्झा मिळवण्यासाठी वापरू नये, अशी या संस्थेची इच्छा होती. ही अनोखी योजना न्यूझीलंडच्या लोकांना देशात राहण्याच्या खर्चाचा सामना करण्यास मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली होती.

न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा