सकाळी नाष्ट्याला “पोहे” खा…

पुणे, १७ डिसेंबर २०२०: “सकाळ” मानवाच्या आयुष्यातील एक अनमोल नैसर्गिक दैणगी आहे. प्रत्येकजणं स्वतासाठी आणि आरोग्यासाठी सकाळचा काही वेळ काढून ठेवतात आणि याच वातावरणात व्यायाम, योगा आश्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेली कार्य करतात आणि या सर्वात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळचा नाष्टा.

सकाळी उठल्या उठल्या सर्व आवरल्यावर तुम्ही माॅर्निंग ब्रेकफास्ट करत असाल जो दिवसभराची ताकद देतो. सकाळी पोटभरून जर नाष्टा केला तर दिवसभर एक वेगळीच उर्जा शरीरात आसते. मात्र, सकाळचा नाष्टा हा निरोगी आसयला हवा आणि आज आपण आश्याच एका नाष्टा प्रकारा बद्दल जाणून घेणार आहोत.

“पोहे” जे कमी वेळातच झटपट तयार होतात आणि महाराष्ट्रातील सर्वात आवडते पदार्थ जे तुम्ही सकाळी नाष्ट्याला खाऊ शकता. पोह्यामुळे मानवी आरोग्याला अनेक फायदे आहेत. जे फार कमी जणांना माहिती आसतील.

पोह्याचे फायदे…..

पोहे पचण्यासही सोप्पे

पोहे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पोहे तयार करण्यासाठी तेल कमी प्रमाणात वापरलं जातं. पोह्यामध्ये लोह आणि कार्बोहाइड्रेट असतात. त्यामुळे हलके आणि सहज पचतात.

अशक्तपणासाठी फायदेशीर

पोह्यामध्ये भरपूर लोह असते. जर तुम्ही पोहे दररोज खात असाल तर तुमच्या शरीरातील अशक्तपणा कमी होऊ शकतो.

मधुमेहाला नियंत्रणात ठेवते

मधुमेहाच्या रुग्णांसाठीही पोहे खूप फायदेशीर आहेत. पोह्याचे सेवन केल्याने शरीरातील साखर नियंत्रणात राहते. पोहे एक उत्तम नाश्ता आहे.

वजन कमी करण्यासही मदत

पोह्यामध्ये भरपूर पोषक असतात. ते पुन्हा पुन्हा खाल्ल्याने भूक लागत नाही. पोह्यामध्ये शेंगदाणे एकत्र खाल्ले जाऊ शकतात. तुम्हाला भरपूर प्रोटीनही मिळेल. यामुळे तुमचे वजनही वाढत नाही.

त्यामुळे सकाळी सकाळी नाष्ट्याला तुम्ही इतर वेगळे पदार्थ खाण्यापेक्षा पोहे खा आणि तंदुरुस्त रहा. आरोग्याला ही फिट ठेवा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा