कोरोना काळात मालवाहतुकीमुळे रेल्वेला अार्थिक फायदा

नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर २०२० : कोरोना काळात प्रवासी वाहतुक बराच काळ पूर्ण बंद ठेवावी लागली. अजूनही ती पूर्वपदावर नाहीच. पण या प्रतिकुल परिस्थितीत भारतीय रेल्वेनं माल वाहतुक अबाधित राखली. नुसतीच अबाधित राखली नाही तर वेगवेगळे प्रयोग करत रेल्वेचं अर्थकारण रुळावर ठेवण्यात हातभार लावला आणि अनेकांना मदतीचा हातही दिला.

रेल्वेनं अलिकडेच क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर व्यवसाय विकास एककांची स्थापना केली आहे. हे व्यवसाय विकास विभाग विविध मालवाहतूक संस्था, नवीन ग्राहक, व्यापारी संस्था आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांनी सादर केलेले नवीन प्रस्ताव, योजना आणि सूचना विचारात घेत आहेत. त्यामुळे ऑटोमोबाईल उद्योग वाहनांच्या वाहतुकीसाठी पुन्हा रेल्वेला प्राधान्य देऊ लागला आहे.

यंदा ऑक्टोबर अखेर पर्यंत रेल्वेनं ४६ रॅक्समध्ये ऑटोमोबाईल वाहतूक केली जी गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षातल्या ऑटोमोबाईल लोडिंगच्या कामगिरीइतकी आहे. नाशिक, कळंबोलीतून महिंद्राची वाहनं थेट बांगलादेशात बेनापोलपर्यंत नेली. नागोठण्याचे स्टील पाईप तिनसुखियाला पोहोचवले. वाहतुकीचा स्वस्तातला पर्याय म्हणून किसान रेल्वे तर भलतिच लोकप्रीय झाली आहे. नागपूरची संत्री देशाच्या कानाकोप-यापर्यंत जात आहेत. बडनेर्यापहून सोयाबीन, मध्यप्रदेशातील खंडव्याहून गहू थेट तमिळनाडूत गेला. भुसावळहून मका बांगलादेशला रवाना झाला. कळमेश्वरहून तर कडबा सुद्धा वाहून नेला. रावेर, सावडा, निंभोर्यालतून केळीची वाहतुक वाढते आहे.

वाढती वाहतुक लक्षात घेऊन बडनेर्या त रेल्वेनं आता कायमस्वरुपी मालवाहतुक केंद्र सुरू केलं आहे. कापड, कापूस, सरकी आणि धाग्याच्या वाहतुकीसाठी हिंगणघाटला सोय केली आहे. एकूणच कृषी आंणि उद्योग क्षेत्रासाठी रेल्वे वाहतुक आता वरदान ठरू लागली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा