पुणे, १८ जुलै २०२२: श्रीलंका सध्या अतिशय बिकट परिस्थितीतून जात आहे. सध्या श्रीलंकेत अतिशय भीषण परिस्थिती आहे. कोलंबोत तर दुकाने आणि मॉल हे बंद ठेवण्यात आले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या दुकानांपर्यंत येण्यासाठी बस, रिक्षा असे कुठलेही वाहन उपलब्ध नाही. कारण या वाहनांसाठी असलेले इंधनांचे दर लोकांना परवडत नाही. पण त्यामुळेच आता श्रीलंकेत महागाई आणि आर्थिंक मंदी दोन्ही एकत्र अवतरले आहे.
सध्या श्रीलंकेत सफरचंदाचे भाव गगनाला भिडले आहेत. एक किलो सफरचंदासाठी १५०० ते १६०० रुपये मोजावे लागत आहे. जो दर जानेवारीमध्ये ३५० रुपये किलो होता. एक किलो पेरुंसाठी ६०० रुपये तर एक किलो संत्र्यांसाठी १६०० रुपये मोजावे लागत आहे. जानेवारीत एक किलो पेरु हे २०० रुपये तर संत्री ३५० रुपये असा दर होता. यामुळे सर्वसांमान्यांना जगण्यासाठी धडपड करावी लागत आहे. नारळ ७० रुपयांवरुन १५० रुपये तर स्ट्रॉबेरी ७७५ रुपयांवर पोहोचली आहे.
श्रीलंकेकडे परकीय चलन नाही. त्यामुळे या परकीय चलनाच्याअभावी माल निर्यात होत नाही. त्यामुळे माल सडून पडण्यापेक्षा विकणे, हा पर्याय दुकानदारांकडे उरला आहे. खाद्यपदार्थांमध्ये पास्ता, नूडल्स हे देशातलेच पदार्थ संपले आहेत. लोणी १३०० रुपये प्रतिग्रँम, काजू ६ हजार रुपये प्रति किलो, अशी महागाई श्रीलंकेत चालली आहे.
पण हे असताना श्रीलंकेतल्या लोकांना देशाबाहेर जाण्यास मनाई आहे. त्यामुळे आता श्रीलंकन लोक उपासमारीने तरी मरतील अन्यथा देशात राहून मरतील, अशी अवस्था नागरिकांची आहे. यामुळे नागरिक अस्वस्थ आहेत. पण सरकार याकडे कुठलेही लक्ष देत नाही. त्यामुळे गोटाबाये राजेपक्षे यांना सरकारमधून नागरिंकांनी हाकलून दिले. पण आता हंगामी पंतप्रधान रणिल विक्रमसिंघे यांच्यावर देशाची अत्यंत महत्त्वाची कामगिरी सोपवण्यात आली आहे. महागाई, आर्थिक मंदी यातून देशाला कसे बाहेर काढायचे, हे शिवधनुश्य विक्रमसिंघे कसे पेलणार, हे पाहणं औत्युक्याचं ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस