गोल पोस्ट महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडच्या पुणे शहर जिल्हा कायदेशीर सल्लागार पदी एड. नितीन दसवडकर यांची...

संभाजी ब्रिगेडच्या पुणे शहर जिल्हा कायदेशीर सल्लागार पदी एड. नितीन दसवडकर यांची नियुक्ती

पुणे, दि. ८ सप्टेंबर २०२०: पुणे शहरातील संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा कायदेशीर सल्लागार पदी एड. नितीन दसवडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एड.नितीन दसवडकर हे पुणे शहरातील एक नामवंत वकील आहेत. त्यांनी आजपर्यंत सामाजिक भान जपत वकिली क्षेत्रात अनेक ठिकाणी काम करून उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. त्यांच्या या वकिली क्षेत्रातील गुणवत्तेची दखल घेता आज त्यांची संभाजी ब्रिगेडच्या पुणे शहर जिल्हा कायदेशीर सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे शहराध्यक्ष हर्षवर्धन मगदम, हवेली तालुका अध्यक्ष प्रदीप बेलदरे पाटील, प्रदिप कणसे संदीप तनपुरे दिलीप देशमुख आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.

error: Content is protected !!
Exit mobile version