राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, सोमवारी हजर राहण्याचे आदेश

सांगली ११ मे २०२३ : एका बाजूला राज्यातील सत्ता संघर्षावरील न्यायालयीन लढ्याचा निर्णय अवघ्या काही तासात लागणार असतानाच राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. ईडीने जयंत पाटील यांना नोटीस बजावल्याने राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ईडीने जयंत पाटील यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे.राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल आणि जयंत पाटील यांच्या नोटिशीचा टायमिंग एकच झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ईडीने आयएल अँड एफएस प्रकरणात पडताळणीसाठी जयंत पाटील यांना नोटीस बजावली आहे. नोटीसीमध्ये पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आयएल अँड एफएस प्रकरणात एका व्यक्तीला अनेक कंत्राटं मिळाली होती. त्या व्यक्तीने अनेकांना कमिशन दिल्याचा ईडीला संशय आहे. या संशयाची पडताळणी करण्यासाठी जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, जयंत पाटील यांनी आपल्याला कोणतीही नोटीस आली नसल्याचे म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा