पेटीएमसह रोजरपेवर ED ची छापेमारी, १७ कोटी जप्त

बेंगळुरू, ३ सप्टेंबर २०२२: चिनी कर्ज ॲपशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बेंगळुरूमधील ऑनलाइन पेमेंट गेटवे- Razorpay, Paytm, Cashfree च्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सहा ठिकाणांवर करण्यात आलेली ही कारवाई दुसऱ्या दिवशीदेखील सुरू आहे. या छापेमारीमध्ये तपास यंत्रणेने मर्चंट आयडी आणि चिनी लोकांच्या बँक खात्यांमध्ये ठेवलेले १७ कोटी रुपये जप्त केले आहेत.

या ॲप कडून १० ते २० हजार लोन मिळत होतं आणि व्याजा सह ते ६ ते १० टक्के वापस घेत होते आणि हे सगळे पैसे चीनला पाठवले जात होते. आणि चायनीज लोन
ॲप रॅकेट मध्ये भारतात राहणाऱ्या चिनी लोकांचा डायरेक्ट सहभाग होता.

बेंगळुरूतील सायबर क्राइम पोलीस स्टेशन मध्ये नोंदवलेल्या १८ एफआयआरवर आधारित हा तपास चालू होता. या एफ आय आर वर अनेक संस्था/व्यक्तींविरुद्ध गून्हा नोंदवण्यात आला असून यामध्ये मोबाईल अॅपद्वारे कमी रकमेचे कर्ज घेऊन संस्था किंवा व्यक्तींची फसवणूक आणि छळ केल्याचा आरोप आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा