पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीचे स्वप्ना पाटकर यांना समन्स!

मुंबई २३ ऑगस्ट २०२२: पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीनं आज स्वप्ना पाटकर यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीनं शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं अटक केली आहे
आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
त्यांची न्यायालयीन कोठडी ५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता ?

मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळा
प्रकरणात राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजीत पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावावर रायगड जिल्ह्यात जमीन खरेदी करण्यात आली आहे. या प्रकरणात ईडीनं चौकशी केली आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात स्वप्ना पाटकर साक्षीदार !

स्वप्ना पाटकर या संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचा घटस्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्ना पाटकर यांनी ईडी कार्यालयात कागदपत्रांसह चौकशीसाठी हजेरी लावली. त्यावेळी ईडीनं स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला होता आणि आज ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी खुलासा होणार आशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा