मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई

5

मुंबई, ७ सप्टेंबर २०२२ : ईडीने एनएसचे माजी प्रमुख रवी नारायण यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. रवी नारायण यांना एक्सचेंजशी संबंधित को – लोकेशन घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे आणखी एक माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांनी कथित फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली होती, तर या प्रकरणांचे समांतर तपास करणाऱ्या सीबीआयला त्यांना को – लोकेशन घोटाळ्याचे प्रकरण सापडले होते.

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनाल्याने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनाही अटक केली होती. या वर्षी १४ जुलै रोजी अंमलबजावणी संचालनाल्याने रवी नारायण यांच्याविरुद्ध मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा