क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवर ईडीची मोठी कारवाई, Vauld ची ३७० कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली, १२ ऑगस्ट २०२२: भारतातील क्रिप्टोकरन्सीचं भविष्य काय असंल? हा प्रश्न यापूर्वीच निर्माण झालाय. दरम्यान, देशात क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांविरोधातील तपासाची व्याप्ती वाढत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यापूर्वी वझीरएक्स नावाच्या एक्सचेंजची मालमत्ता जप्त केली होती आणि काही दिवसांनंतर गुरुवारी Vauldची मालमत्ता देखील जप्त करण्यात आलीय.

Vauldची ३७० कोटींची संपत्ती जप्त

मनी लाँड्रिंगशी संबंधित तपास करत असलेल्या ईडीने गुरुवारी व्हॉल्टची ३७० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. दरम्यान, जागतिक क्रिप्टो एक्सचेंज बिनन्सने सोमवारी जाहीर केलं की ते वझीरएक्ससह त्याचे ऑफ-चेन फंड हस्तांतरण बंद करत आहेत. वझीरएक्सवर ईडीची कारवाई आधीच सुरू आहे. ईडी २,७९० कोटी रुपयांची क्रिप्टो मालमत्ता वझीरएक्सच्या अज्ञात वॉलेटमध्ये हस्तांतरित केल्याचा तपास करत आहे.

क्रिप्टो एक्सचेंजेस विरुद्ध मनी लाँडरिंग तपास

इतंच नाही तर ईडी अनेक भारतीय नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFC) आणि त्यांच्या फिनटेक भागीदारांविरुद्ध मनी लाँड्रिंगची चौकशी करत आहे. RBI च्या कर्ज मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन आणि वैयक्तिक डेटाचा गैरवापर केल्याबद्दल NBFC च्या फिनटेक सहयोगींच्या विरोधात ही तपासणी केली जात आहे. यासोबतच कर्जावर अधिक व्याज आकारण्यासाठी कर्जदारांशी अर्वाच्य भाषेत बोलणं आणि धमकावल्याचाही तपास सुरू आहे.

तपास संस्थेचं म्हणणं आहे की चिनी कंपन्यांची अनेक फिनटेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे आणि त्यांना आरबीआयकडून एनबीएफसीचा परवाना मिळू शकला नाही. अशा परिस्थितीत त्यांनी कर्जाचा व्यवसाय करण्यासाठी सामंजस्य कराराचा मार्ग स्वीकारला आणि बंद पडलेल्या NBFC कंपन्यांशी करार केला, जेणेकरून त्यांना त्यांच्या परवान्यांवर काम करता येईल.

फिनटेक कंपन्यांनी केली हेराफेरी

जेव्हा या प्रकरणाचा गुन्हेगारी तपास सुरू झाला, तेव्हा यापैकी अनेक फिनटेक कंपन्यांनी त्यांची दुकानं बंद केली आणि त्यांनी कमावलेला प्रचंड नफा लाँडरिंग केला. या पैशातून फिनटेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर क्रिप्टो करन्सी खरेदी करून हे पैसे परदेशात पाठवल्याचेही तपासात निष्पन्न झालंय. ईडीचे म्हणणं आहे की या कंपन्यांचा आणि आभासी मालमत्तांचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.

वझीरएक्सच्या दाव्यांमध्ये फरक

याप्रकरणी तपास यंत्रणेने क्रिप्टो एक्सचेंज कंपन्यांना समन्स बजावले आहेत. असं आढळून आले आहे की बहुतेक पैशांचे व्यवहार वझीरएक्स सोबत झाले आहेत आणि खरेदी केलेल्या क्रिप्टो मालमत्ता अनामित परदेशी वॉलेटमध्ये वळवण्यात आल्या आहेत.

ईडीचं म्हणणं आहे की वजीर क्रिप्टो एक्सचेंजने यूएस, सिंगापूरमधील अनेक क्रिप्टो एक्सचेंज कंपन्यांशी वेब करार केला. पण आता वझीरएक्सचे एमडी निश्चल शेट्टी यांच्याकडून मिळालेली माहिती आणि झैनमयच्या दाव्यात फरक आढळून आलाय. हे लक्षात घेऊन ईडीने तपासाची व्याप्ती वाढवत कंपनीची बँक खाती संलग्न केली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा