दिल्ली, १ जून २०२३: दिल्ली मध घोटाळ्याप्रकरणी ईडीने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. ईडीच्या दाव्यात केलेल्या नव्या खुलासांमध्ये आप कार्यकर्त्यांना २०० कोटींची लाच मिळणार होती. तसेच १०० कोटी अड्ˈव्हान्स् देण्यात आले होते. दिल्लीतील दक्षिण गटाने वादग्रस्त उत्पादन शुल्क धोरण रद्द करण्यापुर्वी ही लाच ऑफर केली होती. असे ईडीने आपल्या दाव्यात म्हटले आहे.
ईडीने दाखल केलेल्या ताज्या पुरवणी आरोपपत्रात हा दावा केला आहे. आरोपपत्रात म्हटल्याप्रमाणे आप नेते आणि दक्षिण गट यांच्यात कथितपणे एक करार करण्यात आला होता. या करारानुसार आपला १०० कोटी रुपये अगाऊ देण्यात आले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या जवळचे असणारे आपचे माजी संपर्क प्रमुख विजय नायर यांच्या जवळ ही रक्कम देण्यात आली होती.
तर उर्वरित १०० कोटी रुपये विजय नायर आणि दक्षिण गट यांच्यात विभागले जाणार होते. आपच्या उर्वरित ३.५ वर्षाच्या कार्यकाळासाठी ही भागीदारी कायम राहणार होती. असे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. ईडीच्या या आरोपपत्राची विशेष न्यायालयाने दखल घेतली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर