मुंबई,२८ जूलै २०२२: विरोधकी पक्षातील शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यामागे ईडीची पिडा सुरुच आहे. तर दुसरीकडे आता राज्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणातही ईडीने एन्ट्री केली आहे. खासगी अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षक प्रकरणाची ईडीने स्वतः दखल घेतली असून चौकशी करणार आहे.
या प्रकरणातील फिर्यादी असलेले जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांची चौकशी ईडी करणार आहे. ईडीने किसन भुजबळ यांना चौकशीसाठी २ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये बोलावले आहे. या प्रकरणाची व्याप्ती सुमारे ५० कोटींची असण्याची शक्यता आहे.
यात मनी लाँड्रिंगचे प्रकरण घडल्याचा संशय आहे. एका शिक्षण संस्थेत काही वर्षापूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षण संस्थेमध्ये बनावट कागदपत्र देऊन शिक्षणभरती करण्यात आली होती. यात २३ जणांची बोगस भरती झाल्याचे समोर आले होते. भुजबळ यांनी ही संपूर्ण बोगस भरती प्रकरण उजेडात आणले होते.
१९ ऑक्टोबर २०१९ रोजी या प्रकरणात बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर