युक्रेनमध्ये शिक्षणाची बोंबाबोंब… तर रशियात शाळा उद्धवस्त…

पुणे, १ सप्टेंबर २०२२: २४ फेब्रुवारीला रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु झालं. तेव्हापासून युक्रेनमध्ये शाळेची घंटा बंद आहे. आत्तापर्यंत युक्रेनमधील २८० पेक्षा जास्त शाळा बंद झाल्या आहेत. त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय झाली आहे. आत्तापर्यंत ४१ टक्के शाळा बंद झाल्यामुळे शिक्षण संपूर्णपणे ठप्प झालं आहे. ज्यात नर्सरी, प्ले स्कूल आणि शाळा यांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जास्त नुकसान होत आहे. तर २३०० पेक्षा जास्त नागरिक मारले गेले असल्याचं चित्र आहे.

पण याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शाळांचे रुपांतर आता बॉम्ब साठ्यात झाले आहे. शस्त्रसाठा, बॉम्ब साठा करण्यासाठी शाळांच्या जागेचा वापर करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. इमारतीबरोबर सैंनिकांना रहाण्यासाठी, रणगाडे ठेवण्यासाठी शाळेचा वापर केला जात असल्याचं चित्र आहे.

युक्रेनबरोबर रशियामध्ये वेगळी परिस्थिती नाही. रशियामध्ये शाळेच्या आवारात बॉम्ब साठा केल्यामुळे रशियातही शाळा बंद आहे. तर मे महिन्यात युक्रेनने रशियातील काही शाळांवर हल्ला केला होता. ज्यात शाळेच्या इमारतीसह संपूर्ण नाश झाल्यामुळे रशियातही आता शाळा बंद आहे.

वास्तविक रशिया- युक्रेन युद्धाचे पडसाद त्यांच्याच पुढच्या पिढीवर जास्त प्रमाणात पडत आहे. नवीन पिढी घडण्याऐवजी नाश पावत आहेत. किंबहुना काही काळानंतर रशिया-युक्रेन मुलांनादेखील हातात बंदूका घेऊन लढायला पाठवू शकतात, ही सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेन देशांचे मोठे नुकसान होत आहे. हे चित्र आहे. सध्या युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचे सावट दोन्ही देशांच्या सर्वसामान्य नागरिंकावर पडत आहे. त्यामुळे रोजचं जीवन कसं जगावं हा प्रश्न रशिया आणि य़ुक्रेनपुढे उभा आहे. त्यामुळे कधी हे युद्ध संपणार आणि सर्वसामान्यांची गाडी रुळावर येणार, हाच प्रश्न सगळ्यांसमोर उभा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा