या वर्षीच्या शैक्षणिक वर्षात सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये एकच गणवेश करण्याचा विचार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

6

मुंबई, २३ मे २०२३ : राज्य सरकारच्या शिक्षण विभागाणे या वर्षीच्या शैक्षणिक वर्षात, सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये एकच गणवेश सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून ‘एक राज्य एक गणवेश योजना’ लागू होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

राज्य सरकार ‘एक राज्य एक गणवेश’ या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. सर्व सरकारी शाळांसाठी आता एकच गणवेश लागू असणार आहे. परंतु काही शाळांनी या निर्णयापूर्वीच गणवेश मागवले असल्याने अशा शाळांमधील विद्यार्थी तीन दिवस सरकारी योजने प्रमाणे आणि तीन दिवस शाळेने निर्धारित केलेला गणवेश वापरतील. असेही केसरकर यांनी सांगितले

‘एक रंग एक गणवेश’ धोरण यावर्षी पासून संपूर्ण राज्य राबवले जाणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरू होत आहे. शाळा सुरू होण्यास अवघे काही आठवडे राहिले असताना शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व सरकारी शाळांबाबत ‘एक रंग एक गणवेश’ धोरणाबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला आहे.

या धोरणाबाबत शैक्षणिक संस्थांसोबत बैठक घेतली जाणार आहे. त्यांनाही आम्ही मोफत पुस्तक व गणवेश देणार आहे. एक गणवेश करण्यामूळे शिस्त लागते. या एक गणवेशामागे कोणताही आर्थिक हेतू नाही. याबाबत चुकीचा गैसमज परवला जातोय. यासाठी कंत्राट निघणार आहे. त्यामध्ये कोणीही भाग घेऊ शकते. यामुळे मुलांना दर्जेदार कपडे मिळतील, बुट मिळतील त्यामुळे राज्यातील शासकिय शाळांकडे मुलाची ओढ वाढेल. असेही केसरकर यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा