गोल पोस्ट आरोग्य शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण 

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण 

मुंबई, २२ सप्टेंबर २०२०: देशासह राज्यात कोरोना रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. अशातच आता राज्याच्या शिक्षणमंत्री आणि काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं कि त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जनतेच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे माझी प्रकृती बरी आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाचे सर्व नियम पळून स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी असं आव्हान करत सुरक्षित रहा, काळजी घ्या असं त्या म्हणाल्या.

दरम्यान राज्यात गेल्या २४ तासांत १८ हजार ३९० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात २० हजार २०६ रुग्ण बरे होऊ गेले घरी आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाख ४२ हजार ७७०वर पोहोचला. यापैकी आतापर्यंत ३३ हजार ४०७ रुग्णांचा मृत्यू झाला असून ९ लाख ३६ हजार ५५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

error: Content is protected !!
Exit mobile version