मोदी सरकारने घेतले प्रभावी व ऐतिहासिक निर्णय; आ. सुभाष देशमुख

सोलापूर, १६ जून २०२० :पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षात प्रभावी कामगिरी केली असल्याचा उल्लेख आ. सुभाष देशमुख यांनी सोलापूरातील पत्रकार परिषद केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी केली असून अनेक प्रभावी निर्णय घेतले आहेत असे हीते म्हणाले .

कोरोनाच्या काळात घेतलेले प्रभावी निर्णय , प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना , कलम 370 रद्द करणे, तिहेरी तलाकवर बंदी घालणे किंवा सीएए सारखा महत्वाचा कायदा लागू करणे आणि देशातील अनेक समस्या सोडविणारे ऐतिहासिक निर्णय हे केंद्रातील मोदी सरकारची पहिल्या वर्षातील प्रभावी कामगिरी असल्याचे प्रतिपादन मा. श्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केले.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या वर्षभरातील कामगिरीची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत ते बोलत होते .यावेळी खासदार श्री जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजीं,अक्कलकोट आमदार श्री सचिन कल्याणशेट्टी , जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा सरचिटणीस श्री राजकुमार नाना पाटील , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप पाटील उपस्थित होते

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा