लॉकडाऊन मध्येच साजरी होणार ईद, मशिदीमध्ये जाण्यास मज्जाव

नवी दिल्ली, दि. १८ मे २०२०: मोदी सरकारने पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लावण्यात आलेले लॉकडाऊन वाढविले आहे. लॉकडाऊन ४ सोमवारपासून (१८ मे) सुरू होईल आणि ३१ मेपर्यंत लागू असेल. यावेळी देशभरात धार्मिक स्थळे बंद ठेवली जातील आणि सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली जाईल.

पुढच्या आठवड्यात ईदचा सण आहे. यावेळी ईद लॉकडाऊन ४ मध्ये साजरी केली जाईल. यावेळी कोणालाही ईदगाह किंवा मशिदीत एकत्र येऊ दिले जाणार नाही. लॉकडाऊन ४ दरम्यान धार्मिक स्थळांव्यतिरिक्त जिम, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालये, रेस्टॉरंट्स, हॉटेल, सिनेमा हॉल व मॉल्स बंद राहतील. तथापि, शाळा आणि महाविद्यालयांना ऑनलाईन अभ्यास करण्याची परवानगी दिली जाईल.

रेल्वे, मेट्रो, देशी-परदेशी उड्डाणांवरही बंदी कायम आहे. या वेळी लॉकडाऊनमध्येही अनेक सवलती देण्यात आल्या आहेत, परंतु त्या सवलतींसह अटी लागू करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनासंदर्भात देशात पाच झोन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन रंगरूप असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये प्रवासी वाहने आणि बसेसदेखील राज्यांत धावतील पण त्यासाठी राज्यांमधील परस्पर संमती आवश्यक आहे. यासह, देशभरात अडकलेले लोक आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी सक्षम असतील. हॉटेल आणि रेस्टॉरंट्समधून होम डिलीव्हरीला परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भात, मिठाई दुकाने देखील उघडतील, परंतू तेथे खाद्य पदार्थांना खाण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा