राजगुरूनगर, दि.५ जून २०२०: निसर्ग चक्रीवादळात खेड जुन्नर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. तर खेड तालुक्यातील वाहगाव येथे मायलेकांचा घर पडून दुर्देवी मृत्यु झाला. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करुन पाहणी केली. यावेळी वाहगाव येथील दुर्घटनेत मृत्यु झालेल्या नवले कुटुंबियांना आपातकालीन निधीतून आठ लाखांची मदतीचे धनादेश कुटुंबीयांकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपुर्त करण्यात आला.
दोन दिवसांपुर्वी निसर्ग चक्रीवादळाने खेड व जुन्नर तालुक्यात घरे,शाळा,स्माशनभुमी, समाजमंदिरे,अंगणवाडी, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे त्यामुळे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड तालुक्यातील, करंजविहरे, वाहागाव, धामणे, शिवे तर जुन्नर तालुक्यातील सावरगाव, पारुंडे, येणेरे या गावांमध्ये नुकसानीची पहाणी केली यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम,प्रांतधिकारी संजय तेली,तहसिलदार सुचित्रा आमले खासदार डॉ अमोल कोल्हे आमदार दिलीप मोहितेपाटील ,आमदार सुनील शेळके उपस्थित होते
निसर्ग चक्रीवादळात शेती व घरांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन पंचनामे सुचना दिल्या आहे पंचनामे पुर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: सुनील थिगळे