विधूत प्रवाह शेतजमिनीत संचारल्यानी आठ मेंढ्यांचा मुत्यु ! आजी वाचल्या

पुणे ९ ऑगस्ट २०२२ : शिरुर तालुका मधील अण्णापूर येथील घटना महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे शेतजमीनीमध्ये लाईटीचा खांबावरील विधूत तार तुटुन विधूत प्रवाह शेतजमिनीत उतरल्यामुळे आठ मेंढ्यांचा मुत्यु झाला आहे.

यामध्ये अविनाश माळी यांना प्रचंड नुकसान झाले आहे. मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या आजीनाही शॉक लागून जखमी झालेल्या आहेत. या भागात अनेकजन आकडा वापरतात याकडे महावितरण लक्ष देत नाही. अशा अनेक घटना या परीसरात घडतात. या महिन्यातील ही दुसरी घटना घडली आहे.

असे अविनाश माळी यांनी सांगितले त्यादिवशी आजी मेंढ्या चारण्यासाठी एका शेतजमिनीवर गेली असता. मेंढ्या चरत असताना त्यांना तारांचा स्पर्श झाल्याने ही घटना घडली आहे. आजीनाही शॉक लागून लांब फेकल्याने त्याबचावले आहे. याची चौकशी महावितरने करावी अशी नागरीक करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा