Sangali School Girl Rape Case : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात ८ वर्षीय शाळकरी मुलीवर एका ६५ वर्षीय नराधम वृद्धाने अत्याचार (Sangali School Girl Rape Case) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रसंगी सांगली ग्रामीण पोलिसांनी ६५ वर्षीय नरमध्यास अटक केली असून सुभाष उर्फ भैय्या गोविंद कांबळे असे त्याच नाव आहे. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी घडली असून पीडिताच्या आजीने ग्रामीण पोलिस ठाण्यात (Sangali Gramin Police) फिर्याद दिली.
ही घटना घडताच मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा झाला आहे.पोलिसांनी माहिती अशी माहीती दिली की, पीडितेला एका ५५ वर्षीय महिलेने दत्तक घेतले आहे, मुलगी तिसऱ्या इयत्तेत शिकत असून नराधम आरोपी हा शेजारीच राहतो. तो मोलमजुरी करत असून २६ फेब्रुवारीला मुलगी अंगणात खेळत होती.
त्यावेळी कांबळेने तिला घरत बोलवून घेतले व तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पीडिता घरी गेली. त्यानंतर तिला पोटात त्रास जाणवू लागल्याने ती रडू लागली. यानंतर यासंदर्भात सर्व माहिती कुटुंबीयांनी सांगली पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार नराधम कांबळे याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर