एकदा विचार तर करा! तुम्ही आनंदी आहात का?

51
काही वाईट घडलं, चुकलं, त्रास झाला, नुकसान झालं तर आपण ते का झालं? कसं झालं? कशामुळे झालं. याचा किती विचार करतो. हा विचार करणे अयोग्य आहे असं पण नाही.
मात्र आपल्याला आनंद कशाने होतो? का होतो? काय केल्यामुळे छान वाटतं. याचा आपण किती विचार करतो. अडचण हि आहे, म्हणून एवढंच सांगणं कि कशामुळे तुम्हाला आनंद होतो याचा पण थोडा विचार करता जा.
आपल्या जगण्याला, दिवस-रात्र झगडण्याला काहीतरी अर्थ हवाच ना राव. तुम्ही अनेक गोष्टी करता, त्या कशासाठी? तर आनंद आणि समाधान मिळावं म्हणूनच ना.
तुम्ही जे काही करता ते अर्थपूर्ण वाटणं महत्वाच असतं. तुमचं जगण अर्थपूर्ण व्हावं म्हणून तुम्ही काय करता, याचाही विचार करा. तसे केले तर तुम्ही करत असलेल्या कामातच तुम्हाला आनंद सापडेल.
आनंद मिळविण्यासाठी तुमच्या कल्पकतेला वाव देणाऱ्या किती गोष्टी तुम्ही करता? तुमचं आयुष्य तुम्हीच एकसुरी पद्धतीने जगता आहात का? विचार स्वतःला तुमच्या कामावर तुमचं प्रेम आहे का?
काम करावसे वाटते एक आणि करता भलतेच असं काही तुमचं होत का? जे करायचे असं तुम्ही ठरवता ते काम तुम्ही पूर्ण करता का? तुमचे काम तुम्ही लक्षपूर्वक करता का? खरा आनंद हा आपल्या आत्मनिर्भर वृत्तीत असतो.
सकारात्मक विचार ठेवायला आणि करायला शिका. तुमच्यात काय बदल करता येतील, तुमचा कसा विकास होईल याकडे जास्त लक्ष्य द्या. तुमच्याकडे जे आहे ते किती मोलाचे आहे, ते स्वतःला सांगा. स्वयंशिस्त ठेवा, जे ठरवलं ते रोजच्या रोज करा.
तुमच्यातील संवेदनशीलता जपा, रिकाम्या वेळेचा उपयोग करा, वेळ विनाकारण खर्च करू नका. स्वतःशी बोला, सतत व्यायाम करा, योग्य आहार घ्या. एवढे केले तर आनंदी राहायला वेगळ काही करावं लागणार नाही!

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा