मुंबई, 7 ऑक्टोबर २०२०: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि जळगावमधील स्थानिक नेत्यांची काही दिवसांपूर्वी बैठक झाल्याची चर्चा आहे. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज मुंबईत दाखल झाले आहेत. ते पवार यांना भेटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकनाथ खडसे हे उत्तर महाराष्ट्रातील बडे नेते आहेत. मात्र काही दिवसांपासून ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तसेच याबाबत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याबरोबर त्यांची चर्चा झाल्याचे देखील बोलले जाते आहे. त्यात आज पवार – खडसे भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या बैठकीची वेळ व ठिकाण निश्चित झाले नसले तरी ही भेट होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
खडसे हे आज त्यांच्या चर्चागेट येथील निवासस्थानी आहेत. त्यांच्याशी याबाबत विचारणा केली असता एकनाथ खडसे लपून काही करत नाही असे बोलत विषय टाळला, मात्र भेटणार नसल्याचे देखील काही बोलले नाहीत. मात्र आज जर पवार – खडसे भेट झाली तर यामध्ये काय निर्णय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव











































